नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : {रीती भूतकाळ}
क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. एखादी क्रिया भूतकाळात नेहमी घडली असेल किंवा भूतकाळातील क्रियेची पुनरावृत्ती संदर्भित होत असेल तर त्यासाठी रीती भूतकाळातील क्रियारूप वापरले जाते. उदाहरण : प्रमाण मराठीतील ‘मी पूर्वी कामावर ज़ायच़ो’ या वाक्यातील ‘ज़ायच़ो’ ह्या क्रियापदावरून भूतकाळातील कृतीची पुनरावृत्ती झाल्याची सूचना मिळते. १.0 व्याकरणिक विशेषाची नोंद
मराठीच्या बोलींमध्ये रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी पाच प्रकारच्या पर्यायी रचना आढळल्या आहेत :
(१) [क्रियापद-त+(होत-सुसंवाद)]; (२) [क्रियापद-आयच़्-सुसंवाद]; (३) [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ]; (४) [क्रियापद-त+ज़ा-सुसंवाद]; (५) [क्रियापद-त+अस्-सुसंवाद]. सापडलेल्या पाचही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत. १.१ पर्यायी रचना १ : [क्रियापद-त+होत-सुसंवाद]
रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+होत-सुसंवाद] ही पर्यायी रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.
१.१.१ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. दापोली, गाव पालगड, स्त्री३५, कुणबी, ४थी) आमचे आइवडील भरपूर आमाला शिकवत होते amče aiwəḍil bʰərpur amala šikwət hote am-č-e aiwəḍil bʰərpur ama-la šikwə-t hot-e we.EXCL-GEN-3PL parents much we.EXCL-ACC teach-IPFV be.PST-3PL Our parents used to teach us a lot. १.२ पर्यायी रचना २ : [क्रियापद-आयच़्-सुसंवाद]रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-आयच़्-सुसंवाद] ही रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून आली आहे.
१.२.१ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. दोडामार्ग, गाव आयी, स्त्री३३, कुंभार, ९वी) शाळेत मज्जा करायच़ो आमी šaḷet məǰǰa kərayco ami šaḷe-t məǰǰa kər-ayc-o ami school.OBL-LOC fun.3SGM do-PST.HAB-1PL we.EXCL We used to have fun at school. १.३ पर्यायी रचना ३ : [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ]रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ] ही पर्यायी रचना राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक) |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवणी, कोरची - बोरी |
गोंदिया | गोंदिया - टेमनी व कासा-तेढवा, सडक-अर्जुनी - डुग्गीपार व चिखली |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी |
नागपूर | नागपूर - येरला, भिवापूर - सावरगाव, रामटेक - भोजापूर, नरखेड - उमरी व पांढरी |
वर्धा | आष्टी - खडका, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी |
यवतमाळ | घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा |
अमरावती | अमरावती - सावर्डी व मलकापूर, वरूड - गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद |
अकोला | अकोला - येवता |
वाशिम | वाशिम - शिरपुटी, रिसोड - घोणसर, कारंजा - गिरडा |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
नांदेड | नांदेड - पांगरी, किनवट - इस्लापूर, देगलूर - खानापूर |
हिंगोली | कळमनुरी - मोरवड |
औरंगाबाद | सोयगाव - घोसला |
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - दहिवद, चोपडा - वैजापूर |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी, येवला - बोकटे |
पालघर | वसई - कळंब व निर्मळ, डहाणू - बोर्डी व मुरबाड व पिंपळशेत, तलासरी - उधवा व गिरगाव, मोखाडा - दांडवळ व गिरगाव |
रायगड | रोहा - चिंचवली |
रत्नागिरी | रत्नागिरी - झाडगाव |
सिंधुदुर्ग | मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे |
कोल्हापूर | चंदगड - कोदाळी |
सातारा | वाई - चिखली |
रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+ज़ा-सुसंवाद] ही पर्यायी रचना राज्यातील फक्त ६ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
गडचिरोली | गडचिरोली - शिवणी |
अमरावती | अमरावती - मलकापूर, दर्यापूर - जितापूर |
अकोला | अकोला - येवता |
वाशिम | वाशिम - शिरपुटी, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण, शेगाव - पाडसूळ |
जळगाव | चाळीसगाव - दहिवद |
रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+अस्-सुसंवाद] ही रचना राज्यातील केवळ ५ जिल्ह्यांमध्ये सापडली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक आणि सामाजिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
/जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
बुलढाणा | बुलढाणा - वरवंड |
हिंगोली | कळमनुरी - बाभळी व मोरवड |
नांदेड | नांदेड - लिंबगाव |
परभणी | सोनपेठ - तिवठणा |
कोल्हापूर | कागल - केनवडे (कुणबी-मराठा समाज) |